Mahaparinirvan Din 2020 Chaityabhoomi Live Streaming: यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरबसल्या करा Online अभिवादन; येथे अनुभवा दादर चैत्यभूमी येथील लाईव्ह सोहळा (Video)
चैत्यभूमी | Representational Image | (Photo credit : Forward Press)

Dr. Ambedkar Chaityabhoomi Dadar Live Streaming: कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरी अनुयायांनी दादर (Dadar) येथील चैत्यभूमी स्मारकावर न येण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. चैत्यभूमीवर न येता घरुन बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, ऑनलाईन अभिवादन करण्यासाठी आणि चैत्यभूमीवर थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी काही लिंक्सही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. (कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ऑनलाईन अभिवादन करण्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांचे आवाहन

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन दरवर्षी प्रमाणे साजरा करणे शक्य होणार नाही. मात्र ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ तुम्ही घेऊ शकता. चैत्यभूमीवरील मानवंदना आणि पुष्प वर्षावाचे थेट प्रक्षेपण सरकारतर्फे युट्युब, फेसबुक, ट्विटर आणि दूरदर्शन सह्याद्री वर करण्यात येईल. (Mahaparinirvan Din 2020 Greetings: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मराठी Messages, Images द्वारे या महापुरुषास करा विनम्र अभिवादन)

लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी लिंक्स: 

bit.ly/abhivadan2020yt

http://bit.ly/abhivadan2020fb

http://bit.ly/abhivadan2020tt

BMC Tweet:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी . कोविड-19 नियमांचे पालन करत यंदाच्या वर्षी दादर येथील चैत्यभूमीवर येऊ नका, असे आवाहन केले आहे. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होतात. मात्र कोरोनाचा प्रसार वाढू नये आणि त्याच्या विळख्यात भीमसैनिक अडकू नयेत, हाच यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी देखील अनेक सण, समारंभ, उत्सव सोहळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहेत.