भारतामध्ये 1961 सालीच हुंडा प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता हुंडा (Dowry) मागणं हा दंडनीय गुन्हा आहे पण आज 21 व्या शतकामध्येही या अनिष्ट प्रथांना अनेक विवाहितांना सामोरं जावं लागत आहे. पुण्यामध्ये फ्लॅटचं कर्ज फेडण्यासाठी माहेरातून 2 लाख रूपये आणू न शकल्याने एका विवाहितेला सासरच्यांनी चक्क जमीन साफ करण्याचं अॅसिड पाजून मारल्याचा प्रयत्न केल्याची घटना हांडेवाडी मध्ये समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी कोंढवा (Kondhwa) पोलिस स्टेशन मध्ये खूनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार फिरदोस रेहान काझी यांनी गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीवरून पती रेहान काझी, सासू नजमा काझी, नणंद गजाला काझी आणि हिना शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अॅसिड पाजण्याचा प्रयत्न 12 फेब्रुवारी दिवशी करण्यात आला आहे. हे देखील नक्की वाचा: Amravati Crime: पोटावर बॅग मारल्याने महिलेचा गर्भपात; अमरावती शहरातील पांढुरणा भागातील घटना .
फिरदोस आणि रेहान हे पती पत्नी आहेत. लग्नानंतर ते पुण्यात हांडेवाडीमध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी रेहान ने फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटचं कर्ज फेडण्यासाठी फिरदोस यांना माहेरहून दोन लाख रुपये आणण्याचा दबाव टाकण्यात येत होता. मात्र पैसे देऊ शकत नसल्याने फिरदोसला सासरच्यांनी फिनेल पाजून मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान फिरदोसला यानंतर रूग्णालयात दाखल केले.