कृपया लॉकडाउनबद्दल (Lockdown) अफवा पसरवू नका, असं आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray's यांनी जनतेला केलं आहे. महाराष्ट्रामध्ये मिशन बिगिन अगेन (Mission Begin Again) सुरू आहे. जनतेला पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जाऊ नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला प्रशासनाने सांगितलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांची सुरक्षा हेच सरकारचे प्राधान्य राहणार आहे, असंदेखील आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात आतापर्यंत पाच वेळा लॉकडाऊन घोषीत करण्यात आला. लॉकडाऊन 5.0 मध्ये सरकारने अनेक अटींमध्ये शिथिलता दिली. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले. परिणामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी संकट अद्याप टळलेलं नाही, म्हणत गर्दी केल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा दिला. (हेही वाचा - लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अफवेनंतर ट्विटच्या माध्यमातून स्पष्टीकरण)
कृपया लॉकडाउनबद्दल अफवा पसरवू नका. महाराष्ट्रामध्ये मिशन बिगिन अगेन सुरू आहे. जनतेला पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जाऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांनी जनतेला प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांची सुरक्षा हेच सरकारचे प्राधान्य राहणार आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 12, 2020
दरम्यान, मुख्यमंत्र्याच्या या इशाऱ्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार असल्याच्या अफवा पसरू लावल्या. काही समाजमाध्यमे, वाहिन्यांनी यासंदर्भात बातम्यादेखील प्रसारित केल्या. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, असं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीदेखील आपल्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.