डोंबिवलीमधील (Dombivali) पतपेढी मॅनेजरने (Patpedhi Manager) कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या मॅनेजरने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटदेखील लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्याने आत्महत्येचं कारणं सांगितलं आहे. यात त्यांनी 'मी स्वत: हून माझे जीवन संपवत आहे. यात कोणी दोषी नाही. माझा अंत्यविधी इथेचं करावा,' असं म्हटलं आहे.
पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. योगेश आरोटे, असं या आत्महत्या करणाऱ्या मॅनेजरचं नाव आहे. डोंबिवलीजवळील ठाकुर्ली परिसरात सहकारमित्र मधूबन पतपेढी आहे. या पतपेढीमध्ये योगेश आरोटे हे मॅनेजरचे काम करत असून त्यांच्याकडेच कार्यालयाची चावी होती. आज योगेश नेहमीप्रमाणे चावी घेऊन पतपेढीत आले होते. मात्र, काही वेळानंतर पतपेढीतील एका कर्मचाऱ्याने कार्यालयाच्या खोलीमध्ये योगेश यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांने यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. (हेही वाचा - Hatras Gang Rape: आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही 'दिशा कायदा' संमत करावा; हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर मनसेची राज्य सरकारकडे विनंती)
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर योगेश यांचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. यावेळी त्यांच्या खिश्यात सुसाईड नोट आढळून आली. या चिठ्ठीत त्यांनी 'मी स्वत: हून माझे जीवन संपवत असून यात कोणीही दोषी नाही. माझा अंत्यविधी इथेचं करावा,' असं म्हटलं आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा - Hathras Gangrape Case: हाथरस सामूहिक बलात्कारातील आरोपींना फाशी देण्यात यावी आणि तिच्या कुटूंबाला न्याय देण्यात यावा- रामदास आठवले)
या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भात वाढत असतानाचं अशा स्वरुपाच्या धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. ऑगस्ट महिन्यात डोंबिवलीमध्ये एका कोरोना रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.