Hathras Gangrape Case: हाथरस सामूहिक बलात्कारातील आरोपींना फाशी देण्यात यावी आणि तिच्या कुटूंबाला न्याय देण्यात यावा- रामदास आठवले
Ramdas Athawale (Photo Credits: Facebook)

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार (Hathsar Gangrape Case) पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर या घटनेने देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात (UP) या प्रकरणावरून नेत्यांची मात्र राजकीय खेळी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. मिडियाला तिच्या कुटूंबियांना भेटण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. या प्रकारामुळे विरोधी पक्षांकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे सांगून तिच्या कुटूंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

त्याचबरोबर बसपा नेत्या हे केवळ या प्रकरणावरून राजकारण करत असून त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही असेही रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. Sanjay Raut On Hathras Case: उत्तर प्रदेशातील सरकारने काहीच केले नाही तर मीडियाला तेथे जाण्यास का रोखले जातेय? हाथरस प्रकरणी संजय राऊत यांचा सवाल

तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुद्धा हाथरस प्रकरणी असे म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील सरकारने काहीच केले नाही आहे. तर मीडियाला तेथे का जाऊ देत नाही आहे असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला आहे. संजय राऊत यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, मीडियाला का जाऊ दिले जात नाही हे माहिती नाही. पण येथे त्यांना जाण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यामुळे हाथरस प्रकरणातील तथ्य तरी समोर येईल असे ही राऊत यांनी म्हटले आहे.