Sanjay Raut On Hathras Case: उत्तर प्रदेशातील सरकारने काहीच केले नाही तर मीडियाला तेथे जाण्यास का रोखले जातेय?  हाथरस प्रकरणी संजय राऊत यांचा सवाल
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

Sanjay Raut On Hathras Case:  उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर उत्तर प्रदेशातील सरकारवर सुद्धा आता टीका केली जात असून त्यांना या प्रकरणात काय लपवयाचे आहे असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. तर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुद्धा हाथरस प्रकरणी असे म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील सरकारने काहीच केले नाही आहे. तर मीडियाला तेथे का जाऊ देत नाही आहे असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला आहे.(Hathras Case: हे लोकशाहीवर 'गँगरेप' होत असल्याचेच लक्षण- शिवसेना)

संजय राऊत यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, मीडियाला का जाऊ दिले जात नाही हे माहिती नाही. पण येथे त्यांना जाण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यामुळे हाथरस प्रकरणातील  तथ्त तरी समोर येईल असे ही राऊत यांनी म्हटले आहे.(Hathras Case: 'उत्तर प्रदेश सरकारने दाखवून दिले की, ते इथल्या कायद्यावर व मूलभूत हक्कांवर विश्वास ठेवत नाहीत'- NCP Chief Sharad Pawar)

 Tweet: 

राहुल गांधी  सुद्धा हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघाल्यानंतर त्यांना करण्यात आलेल्या धक्काबुक्की संदर्भात ही संजय राऊत यांनी विधान केले होते. संजय राऊत यांनी असे म्हटले होते की, जे काही राहुल गांधी यांच्यासोबत झाले ते ठिक नव्हते.

तसेच पुढे राऊत यांनी असे ही म्हटले की, पीडित मुलीवर बलात्कार झाला, तिची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर तिचा मृत्यू झाला. ऐवढेच नाही तर तिचे अंतिम संस्कार सु्द्धा व्यवस्थित होऊ दिले नाही. पोलिसांनी तिला निर्दयीपणे पेटवले. जर तुम्ही पीडितेचा आवाज ऐकू शकत नाही, तिच्या परिवाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात. त्यामुळे तुम्ही 'बेटी बचाओ' चा नारा देण्याचा अधिकार नसल्याची टीका तेथील सरकारवर राऊत यांनी केली होती.