Shraddha Murder Case Accused & Police (Photo Credit- ANI)

Shraddha Murder Case: मुंबईतील श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) या तरुणीच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या तपासादरम्यान रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. श्रद्धाच्या मित्रांनंतर मुंबईतील एका डॉक्टरच्या वक्तव्यानेही पुष्टी मिळत आहे की, तिचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला तिला बेदम मारहाण करायचा. एका मित्राने मारहाणीचा फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये श्रद्धाच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत.

मुंबईतील नालासोपारा भागात असलेल्या ओझोन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. एसपी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2000 मध्ये तिला पाठ आणि खांद्यामध्ये असह्य वेदना होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दरम्यान तिला कोणतीही दुखापत झालेली नव्हती. परंतु, तिला पाठीत वेदना होत होत्या. डॉ.एस.पी.शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाला अॅडमिट केले जात असताना आफताब स्वतः तिथे उपस्थित होता, मात्र मुलीच्या कुटुंबातून कोणीही आले नाही. (हेही वाचा - Shraddha Murder Case: पाण्याच्या बिलामुळे श्रद्धा खून प्रकरणात आला नवा ट्विस्ट; शेजारी म्हणाला, आफताब रोज टाकी तपासायचा)

फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेथून पुरावे नष्ट करण्यात आले आहेत तेथे बेंझिन चाचणी केली जाते. तसेच जिथे शंका असेल तिथे केमिकल टाकले जाते. जर रसायनाचा रंग लाल झाला तर नमुना रक्ताचा डाग म्हणून घेतला जातो. पोलिसांनी दोन दिवस आफताबच्या घराची चौकशी केली. यामध्ये बाथरूम आणि स्वयंपाकघरात सिलिंडर ठेवलेल्या ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले आहेत.

प्रियकर आफताबने 18 मे 2022 च्या रात्री श्रद्धाचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. यानंतर बाजारातून करवत आणि पॉलिथिन खरेदी केले. त्याने चौकशीत सांगितले की, त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे 18 पॉलिथिनमध्ये ठेवले होते.

आफताबने श्रद्धाचे रक्ताने माखलेले कपडे महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनात फेकले होते. तपासात हे वाहन दोन ठिकाणी कचरा टाकत असल्याचे पोलिसांना समोर आले आहे. त्या दोन्ही ठिकाणी सफाई कामगारांच्या मदतीने पोलीस श्रद्धाच्या कपड्यांचा शोध घेत आहेत.