राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत (National Food Security Scheme) मे महिन्यात 1 कोटी 24 लाख 95 हजार शिधापत्रिकाधारकांना (Ration Card Holders) 48 लाख 53 हजार क्विंटल अन्नधान्याचे (Foodgrains) वाटप करण्यात आले आहे. यात 17 लाख 18 हजार क्विंटल गहू, 13 लाख 18 हजार क्विंटल तांदूळ, तर 18 हजार 361 क्विंटल साखर वितरित करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माहिती दिली आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो तांदूळ आणि प्रति रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 51 लाख 2 हजार 470 शिधापत्रिकाधारकांना 11 लाख 25 हजार 520 क्विंटल तांदळाचे, तसेच 14 हजार 97 क्विंटल डाळीचे वाटप करण्यात आले आहे. (हेही वाचा - महाराष्ट्र: लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियात अफवा, खोटी माहिती परसवल्याप्रकरणी 395 गुन्हे दाखल तर 211 जणांना पोलिसांकडून अटक)
मे महिन्यात आतापर्यंत १ कोटी २४ लाख ९५ हजार शिधापत्रिकाधारकांना ४८ लाख ५३ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत १७ लाख १८ हजार क्विंटल गहू, १३ लाख १८ हजार क्विंटल तांदूळ, तर १८ हजार ३६१ क्विंटल साखर वितरित- अन्न, नागरी पुरवठा मंत्री @ChhaganCBhujbal pic.twitter.com/YjImjg5TYj
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 18, 2020
राज्य शासनाने कोरोना संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार 76 केसरी लाभार्थ्यांना मे व जून महिन्यासाठी प्रति व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 6 लाख 91 हजार 960 क्विंटल धान्याचे वाटप करण्यात आले असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.