फोटो सौजन्य - फाइल फोटो

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. या लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियात द्वेषजनक भाषण, खोटी माहिती आणि अफवा पसरवल्याप्रकरणी 395 गुन्हे महाराष्ट्र सायबर शाखेकडून रविवारपर्यंत दाखल करण्यात आले आहेत. तसेच व्हॉट्सअॅप संबंधित 169 गुन्हे, फेसबुकच्या माध्यमातून 154 गुन्हे, 18 गुन्हे टिकटॉक आणि सात गुन्हे हे ट्वीटरसह चार गुन्हे इन्स्टाग्रामसंबंधित असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियात कोरोनामुळे लॉकडाउनचे आदेश जाहीर केल्यापासून काही समाजकंटाकांकडून खोटी माहिती पसरवली जात आहे. परंतु सायबर आणि गुन्हे शाखेकडून अशा व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तरीही व्हिडिओ क्लिपचा आणि युट्युबचा चुकीचा वापर करुन माहिती पसरवल्याप्रकरणी 43 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत 211 जणांचा पोलिसांकडून अटक करण्यात आल्याची माहिती सोमवारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.(महाराष्ट्रात COVID 19 विरूद्ध लढण्यासाठी 'आयुष' उपचार पद्धतीने रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न; 'टास्क फोर्स' ला राज्य सरकार कडून मंजुरी)

हिंगोलीत तर टिकटॉकच्या माध्यमातून एका समाजासंबंधित काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवत त्याचा कोरोनाशी संबंध असल्याचे व्हिडिओत शूट केले आहे. त्यामुळे या प्रकरणी 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सायबर शाखेने पालकांना त्यांच्या मुलांच्या सवयी आणि सोशल मीडियाचा वापर खासकरुन 8-17 वयोगटाती मधील मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.(Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर)

दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांची 33,053 वर पोहोचली आहे. यात काल दिवसभराता राज्यात कोरोनाचे 2,347 रुग्ण आढळले आहेत. तर 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची एकूण संख्या ही 1,198 वर पोहोचली आहे. तर 7,688 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत.