Ulhasnagar Murder: धक्कादायक! 400 रुपयांसाठी मित्राची हत्या; उल्हासनगरमधील घटना
Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Man Arrested For Murder of His Friend: ठाणे (Thane) जिल्ह्यात 400 रुपयांच्या वादातून मित्राची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना उल्हानगर (Ulhasnagar) येथे मंगळवारी (2 फेब्रुवारी) दुपारी घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तसेच त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

फैम शेख असे मृताचे नाव आहे. फैमने गेल्या काही दिवासांपूर्वी त्याचा मित्र सोनू गुप्ताकडून 400 रुपये उसने घेतले होते. मंगळवारी दुपारी सोनूने फैमला पैसे परत करण्यास सांगितले. पण त्याने नकार दिला. त्यानंतर सोनूने फैमला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे लक्षात येताच दोघांच्या काही मित्रांनी हाणामारी थांबविण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, भांडण सुरु असताना फैम त्या ठिकाणी असलेल्या एका खांबावर जाऊन धडकला. या धडकेत फैम गंभीर जखमी झाला. त्यानंतर काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे. हे देखील वाचा- Pimpri-Chinchwad: एक, दोन नव्हेतर चक्क सोळा तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुबाडले; पिंपरी चिंडवड येथील एका तरूणीला अटक

याआधी दिल्लीतही गेल्या काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. लॉकडाऊन दरम्यान घेतलेले 77 हजार रुपये परत न मिळाल्याने एका 24 वर्षीय तरूणाने आपल्या 35 वर्षीय मित्राची हत्या केली होती. ही घटना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले होते.