Arrested | (File Image)

धुळ्यात (Dhule) गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला असून चोरीला गेलेल्या जवळपास 12 मोटरसायकली ताब्यात घेतल्यात. तसेच या घटनेत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. धुळे शहरात सतत दुचाकी (Two Wheeler) चोरीच्या घटना घडत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी देखील दुचाकी चोरीची घटना उघडकीस आली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपास सुरू केला. तपासात मोठी टोळी सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. (हेही वाचा - Dombivali Crime: पैसे गुंतवण्याच्या नावाखाली डोंबिवलीतील व्यक्तीला कोट्यवधींचा गंडा; आरोपीला पुण्यातून अटक)

या कारवाईदरम्यान जवळपास पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडून जवळपास 12 दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यातील सहा दुचाकी वाहने हे विविध गुन्ह्यांमध्ये असल्याचे आढळून आले आले. ही वाहने जिल्ह्यासह जिल्हा बाहेरून चोरली असल्याचे उघडकीस आले आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे.