धुळे: केमिकल कंपनी स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर
Maharashtra Chief Minister Davendra Fadnavis (Photo Credits: PTI)

धुळे जिल्ह्यात शिरपूर (Shirpur) येथील वाघाडी (Waghadi) गावाजवळ एमआयडीसी (MIDC) केमिकल कंपनीत आज सकाळी चार बॉयलर फुटल्याने भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आतापर्यंत या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 58 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाचा हादरा इतका तीव्र होता की यामुळे केवळ कंपनीतील कर्मचाऱ्यांनाच नाही तर शेजारील शेतात काम करत असणाऱ्या शेतकरी देखील गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (CM Devendra Fadnavis) यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करून त्यांचे सांत्वन केले आहे.

तूर्तास घटनास्थळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक व अन्य शासकीय कर्मचारी उपस्थित असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखेल ट्विटरच्या माध्यमातून या दुर्घटनेविषयी खेद व्यक्त केला होता.

CMO ट्विट

ऐन सकाळच्या वेळी कंपनीत अनेक कर्मचारी काम करत असताना एकाएकी ही दुर्घटना घडली. या घटनेत कंपनीत अग्निशमन दल आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे मात्र आग आणि धुराचे प्रचंड लोट यामुळे या कार्यात अडचण आहे. म्ह्णूनच अग्निशमन दलाच्या अन्य काही गाड्यांचे देखील पाचारण करण्यात येत आहे.