Representational Image (Photo Credits: File Photo)

धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर (Shirpur)  वाघाडी (Waghadi) गावाजवळ एमआयडीसी  (MIDC) केमिकल कंपनीत आज, शनिवारी 31 ऑगस्ट रोजी सकाळच्या वेळेत भीषण स्फोट झाल्याचे समजत आहे. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून 43 जणांची अवस्था गंभीर आहे. या जखमींना तात्काळ लगतच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय कंपनीत अन्य 70 जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या स्फोटामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ6  जण मृत्यमुखी पडल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र प्रसार माध्यमाच्या सूत्रांनुसार मृतांची संख्या 10 वर आहे. (पुणे: बेकर्स कंपनीत भीषण आग; अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल)

ANI ट्विट

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या स्फोटाचा हादरा इतका भीषण होता की यामुळे कागतच्या गावातील घराच्या भिंतींना सुद्धा तडा गेल्याचे समजत आहे इतकेच नव्हे तर जवळील शेतात काम करणारे काही शेतकरी देखील जखमी झाले आहेत. या फॅक्टरीतील सहा बॉयलर असून आतापर्यंत चार बॉयलरचे स्फोट झाले आहेत. सुरक्षेच्या कारणाने आसपारच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.

तुर्तास अग्निशमन दल आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे मात्र आग आणि धुराचे प्रचंड लोट यामुळे या कार्यात अडचण आहे. म्ह्णूनच अग्निशमन दलाच्या अन्य काही गाड्यांचे देखील पाचारण करण्यात येत आहे.