देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला, अजित पवार मात्र पदभार न स्वीकारताच गेले घरी
Devendra Fadnavis, Ajit Pawar (Photo Credits: ANI)

Devendra Fadnavis takes charge as the new CM: महाराष्ट्र राज्यात भाजप पक्षाचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर नेते अजित पवार या दोघांनी मिळून शनिवारी सकाळी सत्ता स्थापनेचा दावा केला. आणि यालाच विरोध करत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यात भर म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज जाऊन मंत्रालयात पदभार स्वीकारला.

परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात तर पोहोचले. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते उपमुख्यमंत्री पदाचा पदभार न सांभाळतच तिथून परतले. अजित पवार आता आपल्या घराच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्या या कृत्यामागे नक्की काय कारण आहे हे मात्र अद्याप तरी कळलेलं नसून ते शरद पवार यांच्याकडे तर परत जाणार नाहीत ना अशी चर्चा सध्या सुरु आहे.

Maharashtra Government Formation: महाराष्ट्र सत्तापेच उद्या सुटणार; सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्ट देणार अंतिम निर्णय; पहा आजच्या युक्तिवादातील ठळक मुद्दे

दरम्यान मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला आहे आणि त्यांनी त्यांची पहिली स्वाक्षरीही ठोकली आहे. त्यांची ही पहिली स्वाक्षरी त्यांनी वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर केली आहे. दादर येथे राहणाऱ्या श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश फडणवीसांनी स्वतःच्या हाताने सुपूर्द केला आहे.