
आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त आज पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये (Vitthal Rukmini Mandir) (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते सपत्निक पूजा संपन्न झाली आहे. पहाटे 3 च्या सुमारास देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत नाशिक मधील वारकरी दाम्पत्य उगले हे यंदा मानाचे दाम्पत्य म्हणून विठूरायाच्या पूजेला उपस्थित होते. राज्यामधील शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या सुख समृद्धीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी पूजा केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. विठूरायाच्या पूजेमध्ये देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा देखील सहभागी होती.
महाराष्ट्राला 800 वर्षांहून जुनी आषाढी एकादशी निमित्त वारीची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून वारकरी मजल दरमजल करत लाखो दिंड्या घेऊन पंढरपूरामध्ये विठू माऊलीच्या दर्शनाला येतात. दरम्यान, सध्या लाखो भाविक पंढरपूरामध्ये दाखल आहेत. चंद्रभागा नदीच्या काठी भाविकांची मोठी गर्दी आहे. या वारीच्या निमित्ताने पंढरपूरात आलेले अनेक भाविक चंद्रभागेत स्नानासाठी गर्दी करत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न
रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥🚩
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता व कन्या दिवीजा यांच्यासमवेत… pic.twitter.com/b1XxjzRZ1r
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 6, 2025
विठ्ठल मंदिर समितीने गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा शाल घालून सन्मान केला. यावेळी त्यांनी आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.