Devendra Fadnavis Mantralaya Office Vandalized: मुंबई येथील महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर असलेले उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात एका महिलेने तोडफोड केली. यावर 'लाडकी बहीण (Ladki Bahin) चिडली' असा उपरोधीक टोला विरोधकांकडून लावण्यात आला आहे. हाच धाका पकडत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी बोलताना सांगितले की, या प्रकरणाची मी माहिती घेतली आहे. सदरची घटना गुरुवारी (26 सप्टेंबर) सायंकाळी घडली आहे. हे कृत्य करणारी व्यक्ती महिला आहे. तिने कोणत्या उद्विग्नतेतून हे कृत्य केले हे समजून घेऊ. चिडलेल्या लाडक्या बहिणीची समजूत काढू आणि तिची व्यताही दूर करु, असे देखील ते म्हणाले.
विरोधकांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
लाडक्या बहिणीचा राग अनावर का झाला? असा खोच सवाल विरोधकांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणीस यांनी सांगितले की, त्याचे काण आम्ही समजून घेऊ. बहिणीची व्यथाही दूर करु. परंतू, विरोधकांकडे आता कोणतेच मुद्दे शिल्लख राहिले नाहीत. त्यामुळे बोलण्यासारखे काहीच नसल्याने ते आता खालच्या पातळीवर उतरले आहेत. मनात आणलं तर आम्ही देखील खालच्या पातळीवर उतरु शकतो. पण, एखाद्याने ती पातळी गाठली म्हणून माझ्यासरख्यानेही तसेच वागले पाहिजे असे नाही. (हेही वाचा, Devendra Fadnavis Mantralaya Office Vandalized: महिलेकडून यंत्रणेच्या हातावर तुरी; देवेंद्र फडणवीस कार्यालयात तोडफोड प्रकरण)
मंत्रालय परिसरात महिला पोहोचलीच कशी?
सदर महिला सचीवालय फाटकातून मंत्रालय आवारात विनापास दाखल झाली होती. त्यातही सुरक्षा इतकी कडक असताना ही महिला कार्यालयापर्यंत पोहोचूच कशी शकली. आणि पोहोचली तरी तिने तोडफोड केलीच कशी? असा सावला आता उपस्थित केला जात आहे. शिवाय मंत्रालयातील सुरक्षा भंग झाल्याबद्दल सरकारलाही दोषी धरले जात आहे. यावरुन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यावरुन बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, केवळ लडकी बहीणच नव्हे तर, जर कुणी अशा प्रकारे मंत्रालयात प्रवेश केला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. शिवाय, त्यांना जाणीवपूर्वक कोणी पाठवले असले तरीृ तेसुद्धा जाणून घेऊ. (हेही वाचा, Woman Vandalized Devendra Fadnavis' Office At Mantralaya: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड (Watch Video))
तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली
दरम्यान, सदर महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, तिची ओळख पटली असली तरी, ती जाहीर केली गेली नाही. त्यामुळे पोलिसांनी या महिलेची ओळख अद्यापही का जाहीर केली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. सदर महिलेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे. आरोप आहे की, संशयित महिलेने मंत्रालयात विनापास प्रवेश मिळवला. शिवाय, खोटे कारण देत ती गृहमंत्र्यांच्या कार्यालयात गेली. तिथे तिने शोभेच्या झाडांच्या कुंड्या फोडल्या तसेच, मंत्र्यांच्या नावाची पाटी काढून फेकली.