Devendra Fadnavis Cabinet: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे गटासह कोणाला मिळेल संधी? पाहा चर्चित चेहेरे
Devendra Fadnavis, Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि महाविकासाघाडी सरकार कोसळले. शिवसेना पक्षात झालेल्या अभूतपूर्व बंडाळीमुळे हे घडले. परिणामी राज्यात आता देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेत येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. देवेंद्र फडणीस यांच्या मंत्रिमंडळात (Devendra Fadnavis Cabinet) कोणकोणत्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल याबाबतही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. या वेळी केवळ भाजपच नव्हे तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) गटातील मंडळींनाही मंत्रिमंडळात सामावून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सरकार स्थापनेपूर्वीच रस्सीखेच सुरु झाली आहे. या संभाव्य नावांवर टाकलेला हा एक कटाक्ष. अर्थात इथे दिलेली नावे अधिकृत आहेत असे मुळीच नाही. सूत्रांच्या हवाल्याने प्राप्त झालेल्या नावांची इथे केवळ यादी दिली जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे संभाव्य मंत्रिमंडळ

कॅबिनेट

देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार

गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर

प्रसाद लाड, रवींद्र चव्हाण,चंद्रशेखर बाव नकुळे

विजयकुमार देशमुख अथवा सुभाष देशमुख, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील,संभाजी पाटील निलंगेकर, राणा जगजितसिंह पाटील,संजय कुटे

डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित, सुरेश खाडे, जयकुमार रावल, अतुल सावे, देवयानी फरांदे, रणधीर सावरकर जयकुमार गोरे, विनय कोरे, परिणय फुके, राम शिंदे अथवा गोपिचंद पडळकर

राज्यमंत्री

नितेश राणे, प्रशांत ठाकूर,मदन येरावार, महेश लांडगे किंवा राहुल कुल,निलय नाईक, गोपीचंद पडळकर

एकनाथ शिंदे गटाकडून मंत्रिपदासाठी चर्चीत नावे

कॅबिनेट मंत्री

एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री), गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे,अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, बच्चू कडू, तानाजी सावंत, दीपक केसरकर

राज्यमंत्री

संदीपान भुमरे, संजय शिरसाट, भरत गोगावले

भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज महत्वपूर्ण बैठक

दरम्यान, भाजपच्या विधिंडळ पक्षाची एक बैठक आज पार पडत आहे. शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरही भाजप नेत्यांची खलबतं सुरु आहेत. या बैठकांमधूनच पुढील रणनिती ठरवली जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटाबरोबरही बोलणी सुरु असल्याचे वृत्त आहे. या चर्चेमध्ये भाजप आणि शिंदे गट यांच्यातील सत्तावाटपाची बोलणी कशी होतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.