Deathbody Found In Local Train: कल्याण येथील एका लॉजमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती ही घटना ताजीअसताना, विरार (Virar) कारशेड येथे नियमित देखभाल तपासणी दरम्यान रिकामी लोकल ट्रेनच्या डब्यात एक मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. शनिवारी रात्री १०च्या सुमारास मृतदेह सापडून आल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेह आढळून आल्याने रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्याने मृतदेह (Deathbody) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. (हेही वाचा- श्रमजीवी एक्सप्रेस ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; चौकशी चालू
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १० च्या सुमासार, ट्रेन विरारहून आल्यानंतर मृतदेह आढळून आला. विरार कारशेड येथे लोकल ट्रेनच्या डब्यांची तपासणी करताना ही एका व्यवस्थापकाला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. ही घटना रेल्वे व्यवस्थाकाने रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनास्थळी रेल्वे अधिकारी आल्यानंतर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या पुढील प्रकिया कायदेशीर करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मृतदेह सापडल्याने रेल्वे स्थानकावर काही काळ मोठी खळबळ उडाली. मृतदेह कोणाचा आणि अज्ञात व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला आहे या संदर्भात संपुर्ण चौकशी शासकिय रेल्वे पोलिस करत आहेत. या घटनेचे वृत्त फ्री प्रेस जर्नरल यांनी केली आहे.