Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Mumbai Railway Staff Death: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) येथे कोणार्क एक्स्प्रेस रेकच्या कपलिंग प्रक्रियेदरम्यान मध्य रेल्वेच्या 27 वर्षीय पॉइंट्समनचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- मध्य रेल्वेच्या माटुंगा स्टेशन वर मोटारमॅन च्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 3.10 च्या सुमारास मुंबई भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसचे इंजिन जोडले जात असताना ही घटना प्लॅटफॉर्म क्रमांक 16 वर घडली. सूरज सेठ असं मृत व्यक्तीचे नाव होते. तो उत्तर प्रदेशातील रहिवासी होता. 2018 पासून सीआरमध्ये कामाला होता. तो बोरिवली येथील परिसरात राहत होता. त्यांच्या पश्चात त्यांची आई, एक बहिण आणि एक भाऊ असा परिवार आहे.

पॉइंट्समन सूरज सेठने पहिल्याच प्रयत्नात ट्रेनशी जोडलेले लोकोमोटिव्ह बंद करण्यासाठी ट्रॅकवर उडी मारली अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. शंटींगचे काम सुरु असताना पर्यवेक्षक उपस्थित असणे आवश्यक आहे परंतु ते उपस्थित नव्हते. या अपघातानंतर आपत्कालीन सेवांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिस अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरु आहे.