नाशिक: दारूच्या नशेत वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केल्याप्रकरणी मुलाला अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

दारुच्या नशेत मुलानेच आपल्या वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या (Son Killed His Father)केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाड (Niphad) तालुक्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुलगा आणि सुनेच्या भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती पडल्यामुळे वडिलांची हत्या करण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. मात्र, पोलिसांनी सापळा रचून आरोपीस अटक केली. तसेच याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहे. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात धक्कादायक वितावरण निर्माण झाले आहे.

निवृत्ती निरभवने असे मृतांची नावे आहेत. तसेच निवृत्ती यांना तीन मुले आहेत. विलास, कमलेश आणि बबन असे त्यांच्या तिन्ही मुलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्ती यांच्या तिन्ही मुलाचे लग्न झाले असून हे आईवडिलांपासून वेगळे राहत आहेत. कमलेश हा आईवडिलांच्या शेजारील घरात राहत आहे. कमलेशचा मोठा भाऊ विलास व लहान भाऊ बबन हा पत्नी व मुलासोबत बेघरवस्तीवर राहत आहेत. सोमवारी रात्री बबन दारूच्या नशेत आपल्या पत्नीला शिवीगाळ देऊ लागला आहे. दरम्यान, त्याच्या हातात कुऱ्हाड होती. त्यावेळी निवृत्ती निरभवने यांनी मध्यस्ती केली. तसेच तुझ्या पत्नीला शिवीगाळ करू नको, अशी ताकीद दिली. यावर संतापलेल्या बबनने आपले वडील निवृत्ती यांच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. यात त्यांच्या जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांमध्ये धक्कादायक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- Palghar Fire: पालघर येथील हिंदुस्थान पेट्रो फोमला लागलेल्या आगीमुळे कंपनीचे सुमारे 15 कोटींचे नुकसान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन याने आपल्या वडिलाची हत्या केल्यानंतर तो घटनास्थळावरून कुऱ्हाड घेऊन पळून गेला. याप्रकरणी कमलेश निवृत्ती भिरभवणे यांनी निफाड पोलीस ठाण्यात लहान भाऊ बबन निरभवणेविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली.