MP Mohanbhai Delkar Found Dead: खासदार मोहनभाई डेलकर यांचा मृत्यू; मुंबई येथे संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
Mohanbhai Delkar | (Photo Credits-Facebook)

दादरा व नगर हवेली (Dadra and Nagar Haveli ) लोकसभा मतदारसंघातील अपक्ष खासदार मोहनभाई डेलकर (Mohanbhai Delkar) यांचा मृत्यू झाला आहे. ते 58 वर्षांचे होते. मुंबई येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्यांचा मृत्यू झाला, त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याबाबत अद्याप स्पष्टता (Dadra and Nagar Haveli MP Mohanbhai Delkar Found Dead ) नाही. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या असावी असे सांगितले जात आहे. परंतू, पोलीस मात्र अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचले नाहीत.

मोहन डेलकर हे दादरा व नगरहवेली येथून अपक्ष खासदार होते. 1989 मध्ये ते पहिल्यांदा खासदार बनले. लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा अपक्ष खासदार म्हणून निवडूण आले. मोहन डेलकर यांनी भारतीय नवशक्ती पक्षाच्या माध्यमातनही लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते निवडूणही आले होते. सन 2009 मध्ये ते काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडूण आले होते. मात्र, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मात्र ते अपक्ष लढले आणि निवडूणही आले. (हेही वाचा, TikTok Star Sameer Gaikwad Suicide: टिक टॉक स्टार समीर गायकवाड याचा मृत्यू, राहत्या घरात गळफास)

मोहन डेलकर यांचा राजकीय इतिहास पाहता ते पक्ष बदलण्या वाक्बर होते. त्यांनी अनेक पक्षांत प्रवेश केला. मात्र, कोणत्याच पक्षात ते स्थिर होऊ शकले नाहीत असे त्यांच्या राजकीय कारकीर्दीवरुन लक्षात येते. असे असले तरी त्यांना राजकीय यश मात्र मिळत गेले. ते अनेक निवडणुका जिंकले. 2004 मध्ये त्यांनी भारतीय नवशक्ति पार्टी , फेब्रुवारी 2009 मध्ये काँग्रेस, तर लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. नवशक्ती पार्टी, काँग्रेस आणि आता अपक्ष असे ते निवडूण आले. गेल्या वर्षी (2020) त्यांनी जनता दल यूनायटेड पक्षात प्रवेश केला होता.