Cyclone Nisarga: कोथरुडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली नाही असे सहसा घडत नाही; भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेचे टीकास्त्र
Chandrakant Patil and Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

निसर्ग चक्रिवादळ (Cyclone Nisarga) संकटामुळे कोकण आणि प्रामुख्याने रायगड परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करावयास गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना शिवसेना ( Shiv Sena) मुखपत्र दै. सामना (Saamana Editorial) संपादकीयातून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. कोणी चांगले, महाराष्ट्रहिताचे काम करीत असेल व कोथरुडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली नाही, असे सहसा घडत नाही. त्यामुळे पवार, ठाकरे बाहेर बडताच सवयीस जागून त्यांनी बोंब मारली, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांना टोला लगावण्यात आला आहे.

'पवार जागेच आहेत! विरोधकांच्या पोटात वादळ' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात शिवसेनेने भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

दै. सामना संपादकीयातील महत्त्वाचे मुद्दे

  • पश्चिम बंगालात वादळ व महाराष्ट्रात फक्त गार वारे सुटले अशी स्थिती नाही. मग पंतप्रधान दोन-पाच हजार कोटींची मदत घेऊन महाराष्ट्रात का पोहोचले नाहीत? आणि चंद्रकांत पाटलांनीही केंद्राला का जागे केले नाही? प. बंगालात विधानसभा निवडणुका येत आहेत म्हणून केंद्राची लगबग दिसते. महाराष्ट्रात किमान साडेचार वर्षे विधानसभा निवडणूक होत नाही. पुन्हा त्यानंतरही भाजपला येथे सत्ता मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी काहीकाळ झोपलेलेच बरे.
  • शरद पवारांना संकटकाळी जाग असतेच. तेव्हा उगाच विरोधकांनी बोंब मारून स्वत:चेच पोट व घसा दुखवून घेऊ नये. ‘निसर्ग’ वादळात ‘बाम’च्या डब्याही उडून गेल्या आहेत! चंद्रकांत पाटील, दुखणारे पोट नुसतेच शेकत बसा. संकटकाळात महाराष्ट्राचे सरकारही जागेच आहे, पण विरोधकांचा धृतराष्ट्र झाला त्याला काय करायचे? त्यांना चांगले काही दिसत नाही.
  • पश्चिम बंगालात वादळ व महाराष्ट्रात फक्त गार वारे सुटले अशी स्थिती नाही. मग पंतप्रधान दोन-पाच हजार कोटींची मदत घेऊन महाराष्ट्रात का पोहोचले नाहीत? आणि चंद्रकांत पाटलांनीही केंद्राला का जागे केले नाही? प. बंगालात विधानसभा निवडणुका येत आहेत म्हणून केंद्राची लगबग दिसते. महाराष्ट्रात किमान साडेचार वर्षे विधानसभा निवडणूक होत नाही. पुन्हा त्यानंतरही भाजपला येथे सत्ता मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी काहीकाळ झोपलेलेच बरे.
  • संपूर्ण देश कोरोनाग्रस्त झाला आहे हे सत्य, पण महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कोरोना आणि निसर्ग वादळ असे बेकाबू संकट कोसळलेले असूनही कमालीचे राजकारणग्रस्त झाले आहेत. त्यांची कीव करावी तेवढी थोडीच. निसर्ग वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणी जनतेला दिलासा देण्यासाठी शरद पवार हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही रायगडचा छोटेखानी दौरा केला. ते पुन्हा एकदा तेथे जातील असे दिसते. (हेही वाचा, India-China Relations: चीनचे राष्ट्रपती मोदींच्या गावात झोपाळा हलवून गेले पण..: शिवसेना)
  • शरद पवारांना आता जाग आली का? असा उटपटांग सवाल पाटलांनी करावा हे त्यांच्या स्वभावास धरूनच आहे. कोणी चांगले, महाराष्ट्रहिताचे काम करीत असेल व कोथरूडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली नाही असे सहसा घडत नाही. त्यामुळे पवार, ठाकरे बाहेर पडताच सवयीस जागून त्यांनी बोंब मारली. पाटील अशावेळी अचूक वेळ साधतात.
  • शरद पवार नेहमीच जागे असतात. त्यामुळे राजकारणात ते योग्य वेळ साधतात. असे देशाचा राजकीय इतिहास सांगतो. भाजपचे नेते सहा महिन्यांपूर्वी मध्यरात्रीच जागे झाले. त्यांनी राजभवनात पहाटे शपथ सोहळे केले, पण पवारांनी दोन दिवसांत धोबीपछाड दिल्याने गेल्या सहा महिन्यांपासून भाजपवाले झोपलेलेच नाहीत. डोळे सताड उघडे ठेवून जागेपणी महाराष्ट्रात पुन्हा सत्ता येण्याची ते वाट पाहात आहेत. त्यामुळे पवार कोठे गेले, किती वाजता गेले, त्यांना कधी जाग आली वगैरे नोंदी ते आता ठेवू लागले आहेत. संकटकाळात महाराष्ट्राचे सरकारही जागेच आहे, पण विरोधकांचा धृतराष्ट्र झाला त्याला काय करायचे? त्यांना चांगले काही दिसत नाही.
  • वाजपेयींपासून आज मोदींपर्यंत प्रत्येकजण अशा प्रश्नी पवारांशी सल्लामसलत करूनच निर्णय घेत आले आहेत, पण पाटील व त्यांचे लोक ‘‘पवारांना आता जाग आली काय?’’ असे विचारून एकप्रकारे वाजपेयी-मोदींचाच अपमान करीत आहेत.

निसर्ग चक्रिवादळ संकटात झालेल्या नुकसानाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी दौरा करुन पाहणी केली. तेथील नागरिकांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान, शरद पवार यांच्या दौऱ्यावर “शरद पवारांना आताच जाग आली का?,” असा तिरकस सवाल विचारत चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती.