
India-China Relations: चीनचे राष्ट्रपती मोदींच्या गावात झोपाळा हलवून गेले व दोन देशांत संबंध सुधारतील असे सांगूनही गेले. पण त्यानंतर चिनी सैन्याने आमच्या हद्दीत अनेकदा घुसखोरी केली. आधी डोकलाम व आता लढाखमध्ये युद्धाची स्थिती निर्माण केली. ही फसवणूकच आहे, असे सांगत शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना (Saamana Editorial) संपादकीयातून केंद्रातील मोदी सरकारला इशारा दिला आहे. दरम्यान, सीमेवरील सैन्य खंबर आहे. 1962 सालचा हिंदुस्थान आज नाही. आमच्या सैनिकांच्या हाती थाळ्या, चमचे, मेणबत्त्या नसून बंदुकाच आहेत. हे चीनला दाखवून द्यायची वेळ आली आहे, असा टोलाही शिसेनेने केंद्र सरकारला लगावला आहे.
'आहे 56 इंची छाती; तरीही... चिनी मालावर बहिष्कार' या मधळ्याखाली लिहीलेल्या संपादकियात म्हटले आहे की, पाकिस्तानशी लढण्यासाठी 56 इंचाची छाती हवी, असे आम्हाला वाटत नाही. पाकिस्तान आह चीनचा गुलाम आहे. मात्र चीशनी लढण्यासाठी 56 इंचाची छाती हवी व ती पंतप्रधान मोदी यांच्यापाशी आहे. त्यामुळे चीनला घाबरण्याचे कारण नाही. देशाने चिंता करु नये. सीमेवरील सैन्य खंबर आहे. 1962 सालचा हिंदुस्थान आज नाही. आमच्या सैनिकांच्या हाती थाळ्या, चमचे, मेणबत्त्या नसून बंदुकाच आहेत. हे चीनला दाखवून द्यायची वेळ आली आहे, असे सामना संपादकीयात म्हटले आहे. (हेही वाचा, Coronavirus: 'इंडिया' कोरोनाच्या विरोधात थाळ्या वजवत दिवे पेटवतोय, 'भारत' पोटातील आगीवर पाणी मारण्याच्या विवंचनेत- सामना संपादकीय)
1962 साली जे घडले त्याचे खापर आजही पंडित नेहरु व गांधी कुटुंबावर फोडणे हीच आपली चीनविरुद्ध युद्ध सज्जता आजही आहे. राहुल गांधींनी चीनविषयी एखादा प्रश्न विचारला की, चीनची समस्या नेहरुंमुळेच निर्माण झाली असे टोलावून मोकळे व्हायचे. वरुण गांधी हे भाजपचे नेते आहेत. पंडीत नेहरु त्यांचे पणजोबा आहेत हे विसरता येत नाही, असेही दै. सामना संपादकीयात म्हटले आहे.