Mumbai CSMT Station Lighting Images: 20 जून 1887 रोजी मुंबईत व्हिक्टोरिया टर्मिनसचे (Victoria Terminus) लोकार्पण करण्यात आले होते. आज या दिवसाचा आणि परिणामी मुंबईच्या या सर्वात प्रसिद्ध रेल्वे स्थानकाचा 133 वा वर्धापन दिवस आहे. गॉथिक शैली आणि भारतीय स्थापत्य कलेचा सुंदर संगम साधत ही इमारत उभारण्यात आली होती. 1996 मध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून टर्मिनस (CSMT) असे या स्थानकाचे नाव सीएसएमटी पडले. 2004 मध्ये UNESCO ने सुद्धा जागतिक पर्यटन आणि ऐतिहासिक साईट म्हणून या स्थानकाला दर्जा दिला आहे. मागील दोन महिन्यापासून लॉक डाऊन असल्याने सीएसएमटी येथे नुसता शुकशुकाट आहे. ट्रेन व ट्रेनसाठी धावणाऱ्यांच्या अनुपस्थतीने जणू या स्थानकाची रया हरवली आहे. तुम्हीही तुमच्या या लाडक्या स्थानकाला मिस करत असला तर आज त्याच्या वाढदिवशी हे काही खास फोटो पाहून तुमच्या आठवणी ताज्या करा..
छत्रावती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीला रोषणाई केल्यावर येणारा लुक हा मुंबईकरांच्या फोटो मेमरीचा मुख्य भाग आहे. दरवर्षी राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला या इमारतीला तिरंग्यात रोषणाई करण्यात येते. तर पावसात सुद्धा इथे दृश्य पाहण्यासारखे असते
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे फोटो
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
दरम्यान, जगातील सर्वात आश्चर्यकारक स्टेशन म्हणून मुंबईतील 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस; रेल्वे स्थानकाची नोंद झाली आहे. Wonderlust यांनी जगातील दहा आर्श्चर्यकारक रेल्वेस्थानकांची यादी जाहीर केली होती त्यात सीएसएमटी स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे.