श्रद्धांजली सभेसाठी परवानगी मागण्यास गेलेल्या CRPF जवानाला मारहाण, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी
अशोक इंगवले (फोटो सौजन्य- संग्रहित संपादित प्रतिमा)

बारामती (Baramati) येथे लष्करी जवान पोलिसांकडे पुलवामा (Pulwama) हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी कार्यक्रमासाठी परवानगी मागण्यासाठी गेला होता. मात्र पोलिसांनी जवानाचा आदर करण्याऐवजी त्याला पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचा संतप्त प्रकार घडला आहे. यामुळे आता बारातमतीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.

अशोक इंगवले असे या सीआरपीफ जवानाचे नाव आहे. अशोक हे त्यांचे थोरले भाऊ आणि माजी सैनिक किशोर इंगवले यांच्यासह सोनगाव मध्ये शहीद जवानांना श्रध्दांजली देण्याचा कार्यक्रम आयोजित करणार होते. त्यासाठी दुचाकीवरुन इंगळेसह अन्य एकजण पोलीस स्थानकात गेले. मात्र पोलिसांनी तिघांना दुचाकीवरुन आल्याकारणाने वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच सीसीटिव्ही नसलेल्या खोलीत जाऊन मारहणा करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ इंगवले आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होता. त्यामुळे पोलिसांनी व्हिडिओ काढताना पाहिल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मोबाईल फोडला.(हेही वाचा-नाशिक: देवळाली रेल्वेस्थानक उडवू देऊ या निनावीपत्रानंतर आज संशयास्पद बॅग सापडल्याने खळबळ)

इंगवले हे लष्करी वर्दीत असूनही त्यांना मारहाण केल्याने हा लज्जास्पद प्रकार असल्याचे नागरिकांकडून म्हटले जात आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध संताप व्यक्त केला जात असून त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.