नवी मुंबईतील खाडीत वर्षभरापासून फिरत असलेल्या मगरीला अखेर बाहेर काढण्यात यश
नवी मुंबईतील खाडीतील मगर (Photo Credits-Twitter)

नवी मुंबईतील (Navi Mumbai) बेलापूर परिसरातील खाडीत लगतच्या भागातून एका मगरीला अखेर बाहेर काढण्यात आले आहे. याबद्दल वन विभागाकडून माहिती दिली गेली आहे. ही मगर 6.43 फूट असून तिचे वजन 35.4 किलो आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मगर गटार आणि खाडीत फिरत होती. या मगरीचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाल्याचे ठाणे वनाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.(Fish Eating Another Larger Fish-Fact Check: माशाने गिळला मासा, पाहा कसा? जबरदस्त व्हिडिओ, जाणून घ्या वास्तव)

विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मगर ही आधी खाडीत फिरत होती. मात्र नंतर माशांच्या संगोपनासाठी तयार करण्यात आलेल्या आर्टिफिशल तलावात फिरु लागली होती.(रेस्टॉरंटमध्ये छुप्या पद्धतीने घुसलेल्या पक्षाने चोरले चिप्सचे पाकिट, त्यानंतर झाला फरार; Watch Viral Video) 

Tweet:

Tweet:

तर या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर मगरीला पकडण्यासाठी  रविवारी जाळी लावण्यात आली. त्यानंतर मंगळवारी दुपारी तिला अखेर बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तर मगरीला वैद्यकिय मुल्यांकनासाठी नेण्यात आले असून तिला पुन्हा सुरक्षित ठिकाणी सोडले जाणार असल्याचे ही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याआधी सुद्धा गेल्या वर्षात ऑगस्ट महिन्यात नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या खाडीत मगर दिसली होती. या मगरीला पकडून अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे यासाठी सुद्धा वन विभागाकडे नागरिकांनी मागणी केली होती. परंतु त्याकडे वन विभागाकडून दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.