मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणा-या मध्य रेल्वेने रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता रोज रेल्वेने प्रवास करणा-या लोकांची संख्या देखील दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे रेल्वेने विना तिकिट प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या देखील वाढत आहे. नुकत्यात मध्ये रेल्वेने (Central Railway) दिलेल्या माहितीनुसार, मागील 6 महिन्यात विना तिकिट प्रवास करणा-यांकडून मध्य रेल्वेने आतापर्यंत 100 कोटी रुपये दंड वसूल केल्याचा सांगितले आहे. एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2019 पर्यंत म्हणजे मागील 6 महिन्यांतच इतका दंड वसूल केल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्य रेल्वेने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. यात असे म्हटले आहे की, 'रेल्वे प्रवाशांनी विना तिकिट प्रवास करण्याचा गुन्हा करू नये यासाठी हा दंड आकारण्यात येतो. मात्र यावर्षीचा हा दंड मागील वर्षी पेक्षा 14 टक्के जास्त आहे.'
मध्य रेल्वेचे ट्विट:
Ticketless travel: CR nets ₹100. 29 crore during the first 6 months (1st April to 24th September) of the financial year 2019-20. pic.twitter.com/dKR9GO8HO2
— Central Railway (@Central_Railway) September 26, 2019
हेही वाचा- खुशखबर! मुंबई लोकल चे पर्यटक तिकीट घेऊन, तिन्ही लाईन्सवर हवा तेव्हा प्रवास करता येणार
मध्य रेल्वेचे प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी असेही सांगितले आहे की, मागील वर्षी म्हणजेच 2018 मध्ये विना तिकिट प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांकडून 87.98 कोटी दंड वसूल करण्यात आला होता. तसेच 1.5 लाख तक्रारींची नोंद झाली होती.
यामुळे रेल्वे प्रवाशांनी तिकिट बुक केल्यानंतर ती नीट तपासून पाहा. त्यात आपल्या निश्चित स्टेशनाचे नाव आहे की नाही ते तपासून घ्या. तसेच मध्य रेल्वेने पुढे असेही सांगितले आहे की, विना आरक्षित असलेले तिकिट प्रवाशांची स्विकारू नये. मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे प्रवाशांनी नीट पालन केले तुमच्यावर दंड आकारण्याची वेळ येणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे.