प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- ट्विटर)

गायीचे दूध (Cow Milk) 2 रुपयांनी महागले असून आता नवे दर 8 जून पासून लागू होणार आहेत. याबद्दल दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

तर अमूल कंपनीने सुद्धा दूधाचे दर 2 रुयांनी वाढवले होते. त्यामुळे आता दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने दूध दरात वाढ करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र म्हशीच्या दूधाचे भाव यापूर्वी सारखेच राहणार आहेत.(अमूल दूध महागणार, महाराष्ट्र सह 6 राज्यांमध्ये उद्यापासून दूधासाठी 2 रूपये अधिक मोजावे लागणार)

सध्या बाजारात गायीचे दूध 44 रुपये प्रतिलीटर आणि म्हशीच्या दुधासाठी 52 ते 56 रुपये ग्राहकांना मोजावे लागतात. त्याचसोबत दुष्काळी स्थिती, पशूखाद्याचे वाढलेले दर अशा विविध गोष्टींच्या वाढलेल्या दरामुळे सरकारने दूधासाठी पुढील तीन महिन्यांसाठी प्रतीलिटर 5 रुपये द्यावे अशी मागणीसुद्धा करण्यात आली आहे.