अमूल दूध महागणार, महाराष्ट्र सह 6 राज्यांमध्ये उद्यापासून दूधासाठी 2 रूपये अधिक मोजावे लागणार
Amul Hikes Milk Prices (Photo Credit: PTI)

AMUL Milk Price Hike: दूध खरेदीचे भाव वाढल्यानंतर आता अमुल दूध ने त्यांच्या दूधांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार (21 मे) पासून नवा दरानुसार महाराष्ट्रसह देशातील सहा राज्यांमध्ये अमुल दूध 2 रूपयांनी महागणार आहे. त्यामुळे सामान्यांचं आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.  म्हशीच्या दूध दरामध्ये 1 एप्रिल पासून 2 रूपयांनी वाढ; मुंबई, ठाणे येथील नवे दूध दर काय?

ANI Tweet

अमुल (GCMMF ltd)चे मॅनेजिंग डिरेक्टर आर एस सोढी यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, गुजरात, कोलकत्ता, उत्तरांचल, पश्चिम बंगाल, दिल्ली या राज्यांमध्ये आता दूधाचे भाव वधारणार आहेत. 'गोल्ड', 'शक्ती' यांच्याप्रमाणे अमुलच्या सार्‍याच ब्रॅडमधील दूधांमध्ये ही दरवाढ तात्काळ लागू केली जाणार आहे.

महिन्याभरापूर्वीदेखील अमुलने त्यांच्या गाय आणि म्हशीच्या दूधामध्येही दरवाढ केली होती.