स्थलांतरित कामगार (Photo Credits-ANI)

महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Government) लॉकडाउनमुळे अडकलेल्यांना आपल्या घरी जाता यावे यासाठी प्रवासी पास (Travel Pass) देत आहे. मात्र यावर आता काही जिल्ह्यांनी चिंता व्यक्त करत असे म्हटले आहे की, मार्गदर्शक सुचनांचे पालन न केल्यास शहरातून गावात येणाऱ्या लोकांच्या कारणास्तव लोकांच्या कारणास्तव कोरोनाचे संक्रमणाचा फैलाव होण्यास मदत होईल. कोल्हापूर, सिंधूदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, नांदेड सारख्या जिल्हा अधिकाऱ्यांनी याबाबच्या परिस्थिती संदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी पुण्याच्या विभागीय आयुक्त यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फ्रेंसमध्ये असे म्हटले आहे की, बहुसंख्येने येणारे लोक स्वतंत्र अधिवासाच्या नियमांचे पालन करत नाहीत किंवा कोविड19 ची चाचणी करत नसल्यास त्यामुळे स्थानिकांचे नुकसान होऊ शकते. त्यांनी पुढे असे ही म्हटले की, गावात येणाऱ्या गर्दीमुळे कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव वाढू शकतो. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातून येणाऱ्या लोकांना सक्त निर्देशन देत त्यांनी मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे अनिवार्य असावे.(सोलापूर महापालिका मध्ये कोव्हिड केअर सेंटर मध्ये काम करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी ते वॉर्डबॉर्य पर्यंत 216 जागांसाठी भरती; 20 मे पर्यंत दाखल करू शकता ऑनलाईन अर्ज!)

 गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी सुद्धा अशाच प्रकारची चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून बाहेरुन येणाऱ्या लोकांच्यामुळे कोल्हापूर मध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. लोकांच्या येण्याजाण्यामुळे आजार पसरु नये त्यासाठी आम्हाला अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. राज्यातील गृह विभागाने रविवारी असे म्हटले की महाराष्ट्रातील जवळजवळ 3.69 लाख लोकांना प्रवासी पास देण्यात आले आहेत. कारण त्यांना आपल्या घरी जाण्याची परवानगी मिळावी. सोलापूर, अहमदनगर आणि रत्नागिरी मधील गावातील लोकांनी बाहेरुन येणाऱ्या नागरिकांना गावात घेण्यास विरोध केला आहे.