कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत. जगभरात रमजान ईद मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते. मात्र, सगळीकडे कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले आहे. यामुळे यंदाची रमजान ईदचे (Ramadan Eid 2020) घरीच पठण करा, असे आवाहन अल्पसंख्याक विकास आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मुस्लिम बांधवांना केली आहे. रमजान हा मुस्लीम बांधवांसाठी पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात रोजे अर्थात उपवास करण्यासोबतच अनेक गोष्टींची बंधन स्वत:वर घालून घ्यायची असतात. त्यामुळे रमजानचा महिना मुस्लीम बांधवांसाठी खास असतो. त्यातच रमजान ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव एकमेकांची गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा देतात. मात्र, यावर्षी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचे संकट वावरत आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्सचे नियम पाळणे, अतिशय गरजेचे आहे.
भारतात यावर्षी 25 मे रोजी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. रमजान ईद साजरी करताना लॉकडाऊनच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने मुस्लिम बांधवाना केले आहे. सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडणे गरजेचे आहे. यातच राष्ट्रवादी नेते नबाव मलिक यांनीही मुस्लिम बांधवाना महत्वाचा संदेश दिला आहे. कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच पठण करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. हे देखील वाचा- Eid 2020 Special Mehendi: रमजान ईदच्या निमित्ताने काढलेली मेहंदी अधिक गडद करण्यासाठी 'हे' 7 नैसर्गिक उपाय एकदम सुरक्षित!
ट्वीट-
अल्पसंख्याक विकास आणि कौशल्य विकास मंत्री @nawabmalikncp यांनी #रमजानईद #ईदउलफितर निमित्त राज्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा. #COVID_19 संकटाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच पठण करण्याचे केले आवाहन. pic.twitter.com/Aps1RMiGZd
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 24, 2020
शनिवारी चंद्र दिसू शकला नाही म्हणून रमजान ईद 25 मे रोजी साजरा केली जाईल. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपण सावधगिरी बाळगणे आणि सामाजिक अंतर राखणे महत्वाचे आहे. हात मिळवणे आणि मिठी मारण्यापासून आपण दूर असले पाहिजे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे आपण पालन केले पाहिजे असे, दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम, सय्यद अहमद बुखारी म्हणाले होते.