Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

महाराष्ट्राला केंद्राकडून मागणीच्या तुलनेत लसींच्या पुरवठा होत नसल्याने आता राज्यातच कोवॅक्सिनची निर्मिती करण्याचा निर्णय सरकराने घेतला आहे आणि आता त्याच्या निर्मितीला वेग आला आहे. ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, HBPCL चे एमडी संदीप राठोड यांनी केंद्राकडून कोवॅक्सिन निर्मितीसाठी आवश्यक परवानगी मिळाली आहे आणि भारत बायोटेक सोबत आम्ही पुढील कारवाईबाबत चर्चा करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. येत्या 8 महिन्यात लस निर्मिती सुरू होणार आहे असेदेखील ते म्हणाला आहेत.

दरम्यान हाफकिन बायो फार्मस्युटिकल कॉरपरेशन लिमिटेड (Haffkine Bio-Pharmaceutical Corporation Limited)यांचे वर्षाला 22.8 कोटी डोस बनवण्याचं उद्दिष्ट आहे. यासाठी केंद्र सरकार कडून त्यांना 65 कोटी तर राज्य सरकार कडून त्यांना 93 कोटी रूपयांचं अनुदान देण्यात आले आहे. कोवॅक्सिन ही संपूर्णपणे भारतीय बनावटीची पहिली लस आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांच्या प्रयत्नाने त्याची निर्मिती करण्यात आली असून सध्या देशात आपत्कालीन वापरला त्याला मंजुरी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच कोवॅक्सिनने केलेल्या दाव्यानुसार, देशातील आणि परदेशातील कोरोनाच्या व्हेरिएंटवर देखील ही लस परिणामकारक असून पूर्णपणे सुरक्षित आहे.

हाफकिन इंस्टिट्युट कडून यापूर्वी प्लेग, कॉलरा आणि पोलिओ सारख्या आजारांना नियंत्रणात आणण्यासाठी औषधं बनवण्यात आली आहेत. हाफकिन ही भारतातील सर्वात जुनी सरकारी लॅब आहे. आता हाफकिन कोरोना विरूद्धच्या भारताच्या लढाईत देखील हातभार लावणार आहेत.