पुणे: कव्हरवाल्या कारमधील त्यांच्या प्रेमळ चाळ्यांचा नव्हता कोणालाच पत्ता मात्र, एका आजीने केला बोभाटा; कोथरुड येथे प्रेमी युगुलाचा भांडाफोड
Couple these car | Image only representative purpose (Photo credit: pxhere)

Couple Romance in Car: बातमी तशी अनेकांसाठी महत्त्वाची. म्हटलं तर महत्त्वाची नाहीतर गमतीची. पण तितकीच गांभीर्यानेही घेण्याची. घटना आहे पुणे (Pune) शहरातील कोथरुड (Kothrud) येथील परमहंसनगर परिसरातील. एक प्रेमी युगुल प्रेम व्यक्त करण्यासाठी जागेच्या शोधात असलेलं. कदाचित त्यांना एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हवी तशी जागा मिळत नसावी. त्यांनी शक्कल लढवली. शक्कल काय तर, त्यांनी प्रेम व्यक्त करायला चक्क कारचा वापर करायचे ठरवले. मंडळी थांबा. ही कारसुद्धा इथं तिथं रस्त्यावर पार्क केलेली नव्हे बरं. तर चक्क कव्हर घातलेली. आता तुम्हीच विचार करा. कव्हर घातलेल्या कारमध्ये जर एखादे कपल बसले असेल तर, ते कशा अवस्थेत असेल. या युगुलाला वाटलं असवं आपल्या एकांताची मोहीम फत्ते होणार. आपल्या चोरट्या प्रेमाचा कोणालाच पत्ता लागणार नाही. पण, तो त्यांचा गोड गैरसमज ठरला. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका आजीबाईला आला संशय. तिने गाव केले गोळा. आणि युगुलाचा झाला भांडाफोड. आता इतकी उत्सुकता ताणलीच आहे. तर मग वाचा सविस्तर.

जागृक आजीबाईमुळे प्रेमी युगुलाचा भांडाफोड

पुणे शहरातील कोथरुड येथील परमहंसनगर परिसरात मिलेट्री गेट जवळ एक कार पार्क केलेली होती. पार्क केलेल्या इतर कारप्रमाणे या कारवरही कव्हर घातलेले होते. सहज पाहता ही कार कोणीतरी काळजीपूर्वक पार्क केली असून, कारमालकाने तिच्यावर कव्हरही घातले आहे असे वाटावे. कारजवळून अनेक रहिवासी ये जा करत होते. पण, कारकडे विशेषत्वाने कोणाचे लक्ष गेले नाही. दरम्यान, कारजवळून एक आजीबाई निघाल्या होत्या. या आजीबाई नेहमी सतर्क असतात. त्यांना गाडीतील एसी सुरु असल्याचा संशय आला. त्यांनी जरा कानोसा घेतला. गाडीतील एसी खरोखरच सुरु होता. आजीबाईंना त्यांनी वाचलेली वृत्तपत्रातील एक बातमी क्षणार्धात आटवली. 'कारच्या काचा बंद असल्याने लहान मुलाच गुदमरून मृत्यू' बातमीचा हा मथळा त्यांना तपशीलासह आठवत होता. झाले...

बातमीचा मथळा आठवल्याने आजीबाईंचा संशय आणखी वाढला. आजीबाईंना वाटले कारमधील एसी सुरु आहे म्हणजे बहुदा लहान मुले गाडीत अडकली असावीत. कारमालकाच्या ध्यानात न आल्याने त्यांनी कारला कव्हर घातले असावे. आजिबाईंनी ही कार ज्या सोसायटीजवळ पार्क करण्यात आली होती. त्यासोसायटीतील रहिवाशांना कल्पना दिली. रहिवाशांनीही तातडीने सोसायटी अध्यक्षांना बोलवून घेतले. (हेही वाचा, दिल्ली: चालत्या बाईकवर अश्लील चाळे करताना कपल कॅमेऱ्यात कैद; IPS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ (Viral Video))

कारवरचे कव्हर काढून कारमध्ये पाहतात तर काय..

सोसायटीच्या अध्यक्षांनी उपस्थित नागरिक आणि रहिवाशांच्या साक्षीने कारचे कव्हर काढले. उपस्थितांनी कारमध्ये डोकावले. त्यांना समोर जे दृष्ट दिसले ते पाऊनस काही जण कावरेबावरे झाले. तर, काहींनी स्वत:च्याच डोळ्यावर विश्वास न बसल्याने पुन्हा एकदा कारमध्ये डोकावले. ते दृश्य असे होते. एक कपल या कव्हर घातलेल्या कारमध्ये एसी सुरु करुन एकमेकांबद्दल असलेले प्रेम व्यक्त करत होते. कारमधील कपलचे अत्यंत खासगी स्वरुपात असावे असे दृश्य सर्वांसमोर उघड झाले. त्यामुळे काही नागरिक संतप्त झाले त्यांनी या कपलला चांगलेच फैलावर घेतले. तर, काहींनी 'त्यांच्या चोरट्या प्रेमाचा नव्हता कोणालाच पत्ता मात्र, एका आजीने केला बोभाटा' असे म्हणत मिश्किल टोमणा मारला.

पार्क केलेल्या कारचा प्रेमी युगुलं करातय वापर?

दरम्यान, परिसरात गेल्या काही दिवसात पार्क केलेल्या कारमधील म्युजिक सिस्टम, बॅटऱ्या आणि इतर गोष्टी चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आगोदरच हैराण असलेले नागरिक आता पार्क केलेल्या गाड्यांचा प्रेमी युगुलं अश्लिल चाळ्यांसाठीही वापर करु लागली आहेत की काय अशी भीती व्यक्त करु लागले आहेत.