मुंबई मध्ये घरांचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला आता मुंबईत घर घेणं जिकरीचं झाले आहे. अशात म्हाडा (MHADA) कडून काही घरं उपलब्ध करून दिली जातात. काही महिन्यांपूर्वी मुंबईत जाहीर झालेल्या म्हाडाच्या घरांसाठीच्या सोडतीमध्ये आमदार-खासदारांसाठी राखीव घरावर मात्र आता कुणाचाच दावा नाही. म्हाडाचं हे या सोडती मधील सर्वात महागडं घर होतं. 7.57 कोटीचं हे घर मुंबईच्या ताडदेव (Tardeo) भागात आहे. पण कुणीही आमदार, खासदाराने ते घेतलं नाही.
भाजपा आमदार नारायण कुचे हे ताडदेव मधील या घराचे भाग्यवान विजेते होते पण पैशांची जुळवाजुळव करू शकत नसल्याचं सांगत त्यांनी ताडदेव मधील घराचा दावा सोडला. त्यानंतर प्रतिक्षा यादीत खासदार भागवत कर्हाड यांचं नाव होते पण तेही या घरासाठी पुढे आले नाहीत. राखीव कोट्यातील कुणीच पुढे न आल्यास नियमानुसार ते घर सर्वसाधारण यादीमधील व्यक्तीला उपलब्ध करून दिलं जातं. दरम्यान रिपोर्ट्सनुसार, म्हाडाने या घरासाठी बाजारदरापेक्षा 25-30% कमी दराने हे घर उपलब्ध केले होते.
ताडदेव मधील म्हाडाचं . 7.57 कोटीचं हे घर 1531 स्क्वेअर फूटचं आहे. 14 ऑगस्टला जाहीर केलेल्या लॉटरीमध्ये ते नारायण कुचेंना लागलं होतं. मुंबईमध्ये घर घेत असल्यास व्हा सावध! म्हाडा एजंट, एमएमआरडीए अभियंता यांच्यावर ज्येष्ठ नागरिकाची 18 लाखांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल.
जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघातील भाजपचे आमदार कुचे यांनी म्हाडाचा सर्वात महागडा फ्लॅट लॉटरीत जिंकला होता. सोडतीतील सात फ्लॅटपैकी एक फ्लॅट आमदार, खासदार आणि माजी आमदार, माजी खासदारांसह आमदारांसाठी राखीव होता. जिंकल्यानंतर काही आठवड्यांतच, कुचे यांनी पैशांची जुळवाजुळव होत नसल्याचं कारण देत सदनिका म्हाडाकडे सुपूर्द केली. नियमानुसार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मालमत्ता खरेदीसाठी अर्ज केल्याने ते फ्लॅटचे दावेदार बनले. पण नंतर त्यांनी कोणतीही कागदपत्रं सादर केली नाही.