प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: AFP)

Coronavirus: देशभरासह महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे वारंवार सांगितले जात आहे. तरीही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तर मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करत 8,83,100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून दिली गेली आहे.(औरंगाबाद मध्ये 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन, दर शनिवार-रविवार कडकडीत बंद)

तर फेब्रुवारी महिन्यात मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेने मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात संयुक्तपणे कारवाई करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी एकूण 5.97 लाखांची दंड वसूली करण्यात आली होती. तसेच 3,819 नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मास्क न घालणाऱ्यांकडून 200 रुपयांचा दंड स्विकारला जात आहे.(Mumbai: 100 वर्षांच्या आजींनी कोरोनाची लस घेतल्यानंतर, कोविड सेंटरमध्येच साजरा केला 100 वा वाढदिवस Watch Video)

Tweet:

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या आयुक्तांसोबत कोरोनाच्या व्हायरसच्या परिस्थिती संदर्भात बैठक बोलावली होती. त्यावेळी सुद्धा नागरिकांनी नियमांचे पालन करण्यासह परिस्थिती नियंत्रणात कशी आणता येईल याचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांना जर पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर मास्क घाला असे आवाहन ही केले होते.