Coronavirus Vaccine: नागपूर येथे लसीकरण केंद्राबाहेर डोस संपल्याचे बोर्ड, नागरिकांकडून संताप व्यक्त
Nagpur Vaccination Centre (Photo Credits-ANI)

Coronavirus Vaccine: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच राज्यात लसीकरण मोहिमेला उत्तम प्रतिसाद नागरिकांकडून दिला जात असून मात्र सध्या लसीचे डोस संपले आहे. त्यामुळे राज्यातील विविध लसीकरण केंद्रे डोस अभावी बंद करावी लागली आहेत. त्याचसोबत लसीकरण केंद्रांनी गेटवरच लसीचे डोस संपल्याचे बोर्ड लावले आहेत. यामुळे आता नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

तर नागपूरात कोरोना लसीकरण केंद्राबाहेर सुद्धा अशीच स्थिती असून लसीचा साठा सध्या उपलब्ङ नाही असा बोर्ड लावला आहे. त्यामुळे कोरोनावरील लसीचा दुसरा डोस घेण्यास आलेल्या एका व्यक्तीची गैरसोय झाली आहे. लसीचा डोस संपल्यासह ते पुन्हा कधी उपलब्ध होईल याबद्दल काहीच माहिती नाही असे सांगण्यात आले आहे.(Covid Vaccine Politics: 'लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय' राजेश टोपे यांचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना प्रत्युत्तर) 

Tweet:

अशीच परिस्थिती मुंबईतील वांद्रे येथील बेकीसीच्या जंम्बो कोविड सेंटर येथे निर्माण झाली आहे. तेथे ही नागरिकांकडून लसीचे डोस संपल्याने आंदोलन केले जात आहे. तेथे लसीचे डोस कालपर्यंत सेंटरमध्ये येणे अपेक्षित होते. मात्र ते आले नाहीत. त्यामुळे सध्या जंम्बो कोविड सेंटरमध्ये फक्त 160 लीसचे डोस उपलब्ध असल्याचे डीन राजेश डेरे यांनी म्हटले आहे.(महाराष्ट्राला अधिक लसीच्या पुरवठ्यासह ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स उपलब्ध करुन द्यावेत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी)

Tweet:

दरम्यान, महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीची गंभीर स्थिती निर्माण झाली असून त्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे. लसीचा तुटवडा असल्याने पहिल्या लसीचा डोस घेतलेल्यांना दुसरा डोस सुद्धा घेता येणार नाही आहे. त्याचसोबत खासगी रुग्णालयांच्याबाहेर सुद्धा कोरोनाच्या लसीचा तुटवडा असल्याने त्या संदर्भात बोर्ड लावले आहेत.

तर 7 एप्रिल पर्यंत 15.52 लाख लसीचे डोस अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्ससह अॅडमिनिस्ट्रेट मधील लोकांना दिले गेले. त्यापैकी आता 1.72 लाख जणांना कोरोनाच्या दुसऱ्या लसीचा डोस देणे राहिले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असे म्हटले की, राज्यातील विविध ठिकाणी कोरोनाच्या लसीचे डोस संपल्याने लसीकरण केंद्रे बंद करावी लागली आहेत.