देशभरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती संदर्भात नरेंद्र मोदी यांच्यासोबत बातचीत केली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज्याची बाजू मांडत कोविडच्या लढाईत महाराष्ट्रात कुठेही मागे नव्हता आणि राहणार नाही असा विश्वास नरेंद्र मोदी यांच्यासमोर व्यक्त केला. या व्यतिरिक्त कोविडच्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांची सुद्धा माहिती दिली.(Mumbai: स्थलांतरित कामगारांची संख्या वाढल्याने मध्य रेल्वेकडून 3 स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार)
उद्धव ठाकरे यांनी बैठकीत पुढे असे ही म्हटले आहे की, अधिक मोठ्या प्रमाणावर चाचण्या आणि लसीकरण करण्याची सुद्धा तयारी ही केली आहे. परंतु राज्याला अधिक लसीचा पुरवठा आणि अन्य राज्यांतून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्याचसोबत कोविड लढ्यात राजकारण आणू नका म्हणून सर्व राजकीय पक्षांना पंतप्रधानांनी समज द्यावी. हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळाल्यास लसीकरण आणखी वाढविता येईल असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.(COVID19 वरील लसीच्या डोसचा तुडवडा पडल्याने मुंबईतील लसीकरण थांबणार, महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती)
Tweet:
अधिक मोठ्या प्रमाणावर चाचण्या आणि लसीकरणही करण्याची तयारी. मात्र, राज्याला जादा लस पुरवठा, तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स उपलब्ध करुन द्यावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्र्यांकडे मागणी
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 8, 2021
तर उद्धव ठाकरे यांनी आज कोविड-19 लसीचा दुसरा डोस घेतला. 11 मार्च रोजी त्यांनी भारत बायोटेकच्या Covaxin लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर 27 दिवसांनी त्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती.