Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची आज, 19 मे पर्यंतची आकडेवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितली आहे, यानुसार आज दिवसभरात कोरोनाचे 2100 नवे रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा यासोबतच 37 हजार 158 वर पोहचला आहे. यात दिलासादायक म्हणजे आजच्या दिवसभरात सर्वाधिक म्हणजेच 1,202 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे ज्यामुळे कोरोनावर मात केल्लेयांचा आकडा हा 9,639 वर पोहचला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग आता किंचित कमी झाला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचे अंतर 14 दिवसांइतके वाढले आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.Maharashtra Lockdown 4 Guidelines:  Green And Orange Zones, Containment Zones आणि इतर ठिकाणी काय सुरु काय बंद? 

आज राज्यातील नागरिकांशी संवाद साधताना राजेश टोपे यांनी सर्वांंनी कोरोना सोबत राहायला शिका असे आवाहन सुद्धा केले आहे. याचा अर्थच हा आहे की यावर सध्या काहीही औषध नाही आणि ट्रिटमेंट नाही. त्यामुळे जग थांबू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला कामकाज सुरु करावं लागेल. त्यासाठी काही नियम असतील त्या नियमांनुसार आपल्याला जावं लागेल” असंही टोपे यांंनी पुढे म्हंटले.

PTI ट्विट

महाराष्ट्रात दरदिवशी 67 चाचणी केंद्रातुन कोरोनाच्या 15 हजार चाचण्या केल्या जात आहेत. राज्यातील कोरोना मृतांंचा टक्का 3.2% वर आला आहे,असेही टोपे यांनी सांंगितले आहे. या चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी आता राज्यात 17 हजार वैद्यकीय कर्मचार्‍यांंची भरती केली जाणार आहे.

ANI ट्विट

दुसरीकडे, कोविड 19 रूग्णांना ठेवण्यासाठी पलंगाची काही कमतरता जाणवली परंतु आता आम्ही तयार आहोत असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. एनएससीआय डोम, एमएमआरडीए मैदान आणि इतर ठिकाणी व्यवस्था केल्यावर आता कोविड रूग्णांसाठी  15000 बेड्स आणि आयसीयूसाठी 2000 बेड उपलब्ध आहेत असेही टोपे यांनी म्हंटले आहे. याशिवाय खाजगी रुग्णालयातील 80% बेड सुद्धा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विचार आहे.

ANI ट्विट

दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांचे आकडे सुद्धा झपाट्याने वाढत आहेत. हे. गेल्या 24 तासांत भारतात 4970 रुग्ण आढळले असून देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,01,139 वर पोहोचली आहे. सद्य स्थितीत मृतांची एकूण संख्या 3163 वर पोहोचली असून 58,802 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच 39,174 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.