दिलासादायक! मागील 24 तासात महाराष्ट्र पोलीस दलात एकही नवा Coronavirus रुग्ण नाही, मात्र एकाचा मृत्यू
Maharashtra Police (Photo Credit: Twitter)

राज्यात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus)  रुग्णांची संख्या वाढत असताना एक किंचित दिलासादायक वृत्त समोर येत आहे. मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्र पोलीस दलात (Maharashtra Police) कोरोनाच्या संक्रमणाचे प्रमाण काहीसे घटल्याचे समोर येत आहे. मागील 24 तासात महाराष्ट्रातील पोलीस दलात एकही कोरोनाबाधित आढळून आलेला नाही, दुर्दैवाने या व्हायरसमुळे एकाचा बळी मात्र गेला आहे. यानुसार राज्यातील पोलीस दलातील कोरोना बाधितांचा आकडा हा 2,562 वर पोहचला आहे तसेच मृतांची संख्या सुद्धा 34 वर पोहचली आहे. कोरोना व्हायरस संदर्भातील महाराष्ट्रासह देशभराचे अपडेट जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

कोरोना विरुद्धच्या लढ्यात मुंबई पोलीस दलातील कर्मचारी दिवसरात्र एक करून लढत आहेत, या लढ्यात त्यांच्यातील अनेकांना या जीवघेण्या विषाणूची बाधा सुद्धा झाली आहे. तर अनेकांना कामाच्या तणावामुळे अस्वास्थ्य आले आहे. असाच एक प्रकार काळ मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याच्या पत्नीने सांगितलं होता. आपल्या पोलीस पतीला श्वसनाचा त्रास आहे, ताप आहे मात्र कोरोनाचा रिपोर्ट यायला उशीर लागत असल्याने हॉस्पिटलचे सहकार्य लाभत नाहीये अशा या महिलेने नाराजी व्यक्त केली होती. भाजप आमदार राम कदम यांनी या महिलेचा व्हिडीओ पोस्ट केला होता. याबाबत सविस्तर वाचा.

ANI ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात कोरोनाचे नवे 3007 कोरोना रुग्ण सापडले आहेत आणि 91 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 85, 975 पोहचली आहे. यापैकी 43, 591 कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील कोविड विशेष रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजवर 3,060 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले असून 39, 314 जण हे कोरोनमुक्त झाले आहेत.