Coronavirus in India (Photo Credits: PTI)

Coronavirus Update In Pune: पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. आज शहरात 1390 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 65 हजार 966 इतकी झाली आहे. तसेच दिवसभरात 1879 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णांलयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या शहरात 15 हजार 812 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील 1879 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या आता 48 हजार 614 झाली आहे. उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी आभार मानले आहेत. (हेही वाचा -Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार; राज्यात दिवसभरात 12 हजार 248 नव्या रुग्णांची नोंद, 390 जणांचा मृत्यू)

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 15 हजार 812 रुग्णांपैकी 726 रुग्ण गंभीर असून यातील 448 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 278 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. याशिवाय आज शहरात एकाच दिवसात 6 हजारहून अधिक नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 3 लाख 19 हजार 588 इतकी झाली आहे.