महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात आज आणखी 12 हजार 248 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 390 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 15 हजार 332 वर पोहचली आहे. यापैंकी 17 हजार 757 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- COVID19: मुंबई येथील धारावी परिसरात आज आणखी 5 रुग्णांची वाढ; कोरोनाबाधितांचा एकूण संख्या 2 हजार 617 वर
एएनआयचे ट्वीट-
Maharashtra reports 12,248 new #COVID19 cases and 390 deaths today; 13,348 patients discharged today. The total positive cases in the state rise to 5,15,332 including 3,51,710 recovered patients and 17,757 deaths. Active cases stand at 1,45,558: Public Health Dept, Maharashtra pic.twitter.com/J3wRVM1CfQ
— ANI (@ANI) August 9, 2020
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव महाराष्ट्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी मिशेन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात देण्यात आलेल्या सवलतींसह 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा राज्यातील दरामध्ये आणखी सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळते आहे. आज नवीन 13 हजार 348 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 51 हजार 710 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.