Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

चीन मधून वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. चीन नंतर आता इटली येथे सर्वाधिक नागरिकांना मृत्यू झाला आहे. तसेच भारतासह महाराष्ट्रात सुद्धा कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून त्याच्या रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनच्या परिस्थितीत घरातच थांवावे असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 150 च्या पार गेला आहे. मात्र आता ताज्या अपडेटनुसार कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

एएनआय यांनी ट्वीट करत याबाबत म्हटले आहे की, राज्यात कोरोना व्हायरसमुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या 6 पैकी 4 जण हे मुंबईतील असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागरिकांसोबत कोरोना व्हायरस संदर्भात बातचीत करत असतात. तसेच कोरोना व्हायरसचे संकट दूर करण्यासाठी सरकार सक्षम असल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांसाठी सुरु राहणार असल्याने त्यांनी त्यासाठी गर्दी करुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास टाळावे असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.(Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे नवे 8 रुग्ण आढळल्याने आकडा 167 वर पोहचला, आरोग्य विभागाची माहिती)

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर देशातील डॉक्टर्स रात्रंदिवस काम करत आहेत. तसेच पोलिस ही रस्त्यांवर गस्त घालून नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन करत आहेत. सध्या महाराष्ट्रात राज्य सरकारकडे कोरोनाचा सामना करण्याची उत्तम सोय आहे. मात्र त्यात जर त्यांना अधिक मदत हवी असेल तर नौदल सज्ज असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.