कर्फ्यू दरम्यान व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीला अटक (Photo Credits-ANI)

देशभरात कोराना व्हायरसचे महाभयंकर संकट ओढावल्याने नागरिकांना काळजी घेण्याच आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाबाधितांचा आकडा आता 700 च्या पार आणि महाराष्ट्रात 100 च्या पार गेला आहे. असे असूनही नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांना पुढे येऊ कारवाई करावी लागत आहे. या संदर्भातील व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. तर जळगाव येथे कर्फ्यूच्या परिस्थितीत बाईकवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईलवरुन व्हिडिओ शूट केला. या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

राज्यात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोकळ बांबूचे फटके पोलिसांकडून दिले जात आहेत. कारण वांरवार सांगून नागरिकांना ऐकायचे नसल्याने ही भुमिका पोलिसांनी घेतली आहे. तर जळगाव येथे मोटरसायकवरुन जाणाऱ्या व्यक्तीने आझाद नगर परिसरातील व्हिडिओ कर्फ्यू असताना देखील शूट केला. यामुळे या व्यक्तीला धुळे पोलिसांकडून अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे वारंवार नागरिकांना कोरोना व्हायरस पासून बचाव करायचा असेल तर सरकारच्या नियमांचे पालन करा असे आवाहन करत आहेत.(Coronavirus: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोलावली तातडीची बैठक) 

दरम्यान, लॉकडाउनच्या दिवसात नागरिकांना अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहेत. परंतु गोरगरिबांचे या काळात खुप हाल होत आहेत. त्यामुळे काही जणांनी आपल्या घरची वाट पकडली आहे. तर आज मुंबई-पुणे महामार्गावर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या एका टेम्पो मधून 20-30 जणांची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.