संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) ने धुमाकूळ घातला असून देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रातच (Maharashtra) आहेत. यात राज्याचा विचार केला असता महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत (Mumbai) कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 01 हजार 224 वर पोहचली आहे. मात्र तरीही एकूणच ब-या होणा-या रुग्णांचा विचार केला असता मुंबईत ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. एकूणच ही पार्श्वभूमी पाहता मुंबईत पुढील 2 आठवड्यात कोरोना व्हायरस नियंत्रणात येईल असा अंदाज आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी एका गणितीय अंदाजावरुन व्यक्त केला आहे.
कोविड-19 मुळे गेले काही महिने मुंबईचे जनजीवन पुर्णपणे ठप्प झाले आहे. घड्याळ्याच्या काटावर धावणारी मुंबई एकाएकी शांत झाली. मुंबईचे ते सुंदर रुपडं या कोरोना व्हायरसने पुर्णपणे बदलून टाकले. मात्र यात दिलासादायक बातमी म्हणजे येत्या 2 आठवड्यात ही स्थिती नियंक्षणाता येईल असा अहवाल आयआयटी मुंबईच्या संगणकशास्त्र विभागातील डॉ. भास्करन रमण यांनी दिला आहे.
‘लेविट्स मॅट्रिक्स’ या गणितीय प्रारूपाच्या आधारे हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच राज्यातील कोविड-19 ची स्थिती पूर्णपणे आटोक्यात येण्यास 2-3 महिने जातील असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) काल (19 जुलै) तब्बल 9 हजार 518 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 3 लाख 10 हजार 455 वर पोहचली आहे. यापैकी 11 हजार 854 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 69 हजार 569 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.