Kalyan RPF Unit Stiching Mask (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या भीषण संकटाला लढा देण्यासाठी सर्व सरकारी स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. अगदी खारीचा वाट उचलून प्रत्येक जण कोरोनाला मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच कल्याण रेल्वे स्थानकातील (Kalyan Railway Station) आरपीएफच्या (RPF) कर्मचाऱ्यांनी सुद्धा एक नवा उपक्रम राबवला आहे. कल्याणच्या आरपीएफ युनिट मधील सर्व कर्मचारी दिवसाला तब्बल 2000 मास्क शिवून रेल्वे स्थानकातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी वापरत आहेत, इतकेच नव्हे तर अन्य अगरजूंना सुद्धा हे मास्क उपलब्ध करून दिले जातात. याबाबत मध्य रेल्वेकडून ट्विटर च्या माध्यमातुन माहिती देण्यात आले आहे, याशिवाय, मध्य रेल्वे मुंबई आरपीएफ गटाकडून विविध 13 ठिकाणी गरजू आणि गरीब व्यक्तींसाठी जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सद्य घडीला मुंबई लोकल ही लॉक डाउनच्या अंतर्गत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे, अशावळी आरपीएफ कर्मचाऱ्यांना काहीसा वेळ मोकळा होता, या वेळेचा सदुपयोग करून त्यांनी अशा प्रकारच्या सेवा आपल्या नागरिकांना पुरवण्यासाठी हे उपक्रम सुरु केले आहेत. सोशल मीडियावर या उपक्रमाचे जोरदार कौतुक होत आहे.

ANI ट्विट

दरम्यान, यापूर्वी तुरुंगातील कैद्यांच्या रूपात असणाऱ्या मनुष्यबळाचा वापर करून मास्क शिवण्याचा उपक्रम देखील राबवण्यात आला होता. ऑन ड्युटी असणारे पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी यांच्यासाठी दिवसाला ठराविक संख्येचे मास्क बनवण्याची जबाबदारी कैद्यांवर सोपवण्यात आली होती. सद्य घडीला महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा सर्वात अधिक आकडा आहे. खबरदारीचा मार्ग म्हणून येत्या 14 एप्रिल पर्यंत सर्व काही बंद ठेवण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. अशा काळात अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळावी म्हणून असे उपक्रम राबवणे स्तुत्य आहे.