Coronavirus In Maharashtra: पुणे जिल्ह्यात 32 कोरोना बाधित; 10 जणांची यशस्वी उपचारानंतर रूग्णालयातून सुट्टी
Screening for coronavirus | Representational image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात पुणे शहरात पहिला कोरोना बाधित असल्याचं 10 मार्चला समजलं आणि सर्वत्र खळबळ पसरली. दुबई प्रवास करून आलेलं हे जोडपं कोरोनाबाधित असल्याने त्याच्या सअंपर्कातील सार्‍यांची शोधाशोध सुरू झाली. दरम्यान आता ते कोरोनामुक्त असल्याने घरीच आराम करत आहे. पुण्यापासून सुरू झालेलं कोरोना व्हायरसचं संकट आता महराष्ट्रात पसरयला सुरूवात झाली आहे. दरम्यान आजच्या घडीला महाराष्ट्रात 136 कोरोनाबाधित असून पुणे जिल्ह्यात 32 रूग्ण आहेत. दिलासादायक बातमी म्हणजे आता यापैकी 10 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पुण्याच्या नायडू रूग्णालयामध्ये कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. कोरोना बरा होऊ शकतो त्यामुळे त्याच्याबाबत भीती बाळगू नका तर दक्ष रहा असे आवाहन सध्या आरोग्यमंत्रालयाकडून करण्यात येत आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आता 724 पर्यंत पोहचला असून त्यापैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. Coronavirus In Maharashtra: पुणे शहरात क्राईम ब्रांच कडून मास्कचा काळाबाजार करणार्‍यांवर धाड; दोघांविरोधात गुन्हा दाखल.  

मुंबईप्रमाणे पुणे मध्येही स्वतंत्र 700 खाटांच्या कोरोना रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी100 खाटा आयसीयूसाठी असतील अशी माहितीदेखील राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती देताना येत्या काही दिवसांत कोरोनामुक्त होणार्‍यांचाही आकडा वाढत जाईल असं म्हटलं आहे. त्यामुळे एकत्रपणे या जागतिक संकटाचा सामना करू असे ते म्हणाले.

ANI Tweet  

आज महाराष्ट्रात विदर्भात नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 4 नागपूर तर 1 विदर्भात आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून नागपूरात कोरोना बाधितांमध्ये 3 डॉक्टरांचा समावेश आहे अशी ऑडिओ क्लिप व्हायरल होत होती मात्र ती खोटी असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. तर आज याप्रकरणी 3 जणांना अटक देखील करण्यात आली आहे.