Coronavirus In Maharashtra: पुणे शहरात क्राईम ब्रांच कडून मास्कचा काळाबाजार करणार्‍यांवर धाड; दोघांविरोधात गुन्हा दाखल
Pune | Photo Credits: Twitter / ANI

महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस संसर्गाचा वाढता धोका पाहता काही समाजकंटक या भीतीचा वापर करत मास्कचा काळाबाजार करत असल्याचं समोर आलं आहे. एकीकडे जग कोव्हिड 19 या जागतिक आरोग्य संकटाचा सामना करत असताना पुणे शहरामध्ये काल (26 मार्च) दिवशी नरपातगिरी चौक परिसरामध्ये एका गोडाऊनवर पुणे क्राइम ब्रांच कडून धाड टाकण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या स्वरूपात मास्कचा काळा बाजर होत असल्याचं समोर आल्याने दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी मुंबईच्या विविध भागात अशाच प्रकारे पोलिसांकडून घालण्यात आलेल्या धाडीमध्ये कोट्यावधी किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. Coronavirus in Maharashtra: डोंबिवली येथील 25 वर्षीय तरुण COVID-19 पॉझिटिव्ह; तुर्कीहून परतल्यावर हजारो पाहुण्यांची उपस्थिती असलेल्या विवाहसोहळ्याला लावली हजेरी

कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरलाच पाहिजे असा गैरसमज नागरिकांच्या मनात आहे. त्यामधूनच ग्राहकांची मास्क खरेदीला गर्दी वाढली आहे. मात्र आता दुकानदार अनेक ठिकाणी चढ्या दराने मास्क विक्री करत असल्याचं समोर आलं आहे. मात्र शासनाने देखील ग्राहकांची लूट करणार्‍यांविरोधात कडक पावलं उचलली जातील असे आदेश दिले आहेत. दरम्यान बाजारात बनावट सॅनिटायझरचादेखील सुळसुळाट आहे. Coronavirus Outbreak: मास्क वापरून COVID 19 चा धोका टाळता येऊ शकतो का? जाणून घ्या या '8' टीप्स.

ANI Tweet 

पुणे शहरापासूनच महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा धोका वाढत गेला. 10 मार्चला पुण्यातील दुबईहून आलेले पहिलं दांपत्य कोरोनाबाधित आढळलं आणि राज्यात खळबळ पसरली. सुदैवाने ते दांपत्य आता कोरोनामुक्त झालं असून हॉस्पिटलमधून घरी रवाना झालं आहे. आज पुणे पालिका आयुक्त यांनी देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यांत 32 कोरोनाबाधित असून त्यापैकी 5 जणांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आले आहे.