Mukund Keni | (Photo Credits- Twitter)

ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) नगरसेवक मुकुंद केणी (Mukund Keni) यांचे निधन झाले आहे. त्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली होती. ठाणे येथील रुग्णालयातच गेले काही दिवस रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश मिळू शकले नाही. परिणामी त्यांचे निधन झाले. आपण लवकरच ठणठणीत बरे होऊ आणि लोकसेवेत पुन्हा कार्यरत होऊ, अशी भावना केणी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती. मात्र, कोरोना विरुद्धच्या लढाईत त्यांना अपयश आल्याने त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले.

शिवसेना नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर यांचेही कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन झाल्याचे वृत्त काही कालच आले होते. हरिश्चंद्र आमगावकर शिवसेनेचे मीरा भाईंदर महापालिकेतील नगरसेवक होते. त्यांनाही काही आठवड्यांपू्र्वी कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (हेही वाचा, Coronavirus Updates: मुंबई महापालिका उपायुक्त शिरीष दीक्षित यांचा कोरोनामुळे मृत्यू)

दरम्यान, राज्याचे गृहनिर्माण मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आव्हाड यांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली. डॉक्टरांचे प्रयत्नांच्या जोरावर आव्हाड यांनी ही लढाई जिंकली.