Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊनचे आदेश कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. लॉकडाऊनच्या 5.0 च्या टप्प्यात नियमात शिथीलता आणत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याच दरम्यान आता मुंबईत आज कोरोनाच्या नव्या 1015 रुग्णांची भर पडली असून तर 58 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे कोविड19 चा आकडा 50,878 वर पोहचल्याची माहिती म्युनसिपल कॉपरपॉरेशन ग्रेटर मुंबई यांनी दिली आहे.(Coronavirus Updates: मुंबई महापालिका उपायुक्त शिरीष दीक्षित यांचा कोरोनामुळे मृत्यू)

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सरकारकडून त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना सुद्धा कोरोनाच्या परिस्थितीत स्वत:सह परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर आणि नर्स यांच्याकडून कोरोनाबाधित रुग्णांवर अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. तसेच कोरोना वॉरिअर्स सुद्धा सध्याच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत.(BMC चा मोठा निर्णय; कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या बीएमसी कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांना मिळणार 50 लाखांची भरपाई)

दरम्यान, राज्यातील कोरोना व्हायरसचा वेग जरी संथावला असला तरीही त्याची साखळी अद्याप तुटलेली नाही. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 888529 वर पोहचला असून 3169 जणांचा बळी गेला आहे. तसेच अद्याप 44375 जणांवर उपचार सुरु असून 40975 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे.