मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) मूल्यांकन विभागाचे निरीक्षक (Inspector OF Assessment Dept) मधुकर हरियाण (Madhukar Haryan) यांचे आज निधन झाले. त्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली होती, अशी माहिती मुंबई महापालिकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. मधुकर हरियाण हे अत्यंत कर्तव्यदक्ष होते. त्यांनी मुंबईकर व गरजूंच्या सेवेत स्वत: ला झोकून दिले, अशी भावनाही ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या शेवटच्या अद्ययावत वृत्तानुसार महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 729 नवे कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांसह राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 9318 इतकी झाली आहे. यातील 1388 रुग्ण हे उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आले आहेत. तर , आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना व्हायरस बाधित 400 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
धक्कादायक असे की, राज्यातील कोरोना व्हायरस रुग्णाचा संसर्ग राज्यातील डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी आणि विविध विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांनाही होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारे कोरोना व्हायरसचे संक्रमन रोखण्यासोबतच राज्या सरकारी कर्मचाऱ्यांना होत असलेली कोरना लागण रोखणे हा देखील राज्यासमोरचे मोठे आव्हान ठरले आहे. (हेही वाचा, महाराष्ट्र पोलीस दलातील 50 ते 58 वयोगटातील कर्मचाऱ्यांना सुट्टी देणार- DGP सुबोध कुमार जयस्वाल)
बीएमसी ट्विट
Our very own, Shri Madhukar Haryan (Inspector, Assessment Dept, BMC) passed away today. He had devoted himself in the service of Mumbaikars & the needy.
May his soul rest in peace. Our thoughts & prayers are with the Haryan family.
He tested COVID +ve
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 29, 2020
दरम्यान, कोरोना व्हायरस संकट नियंत्रणात आणण्यासाठी राज्य आणि देश अशा दोन्ही पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. वेगवेगळ्या राज्यांतील राज्य सरकारं आणि केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करत आहेत. त्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. असे असले तरी कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अर्थात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण नियंत्रणात असले तरी ही संख्या वाढते आहे हे चिंताजनक मानले जात आहे.